एक आव्हान : जॉब करते लग्न नको


मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण...... 

या वर्षी म्हणजेच २०२१ ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय आहे

 " आव्हानांची निवड" #ChooseToChallenge 

त्यातीलच एक आव्हान आहे लग्न. आज सुद्धा बऱ्याच गावांमध्ये  मुलींचे  वय १७,१८ होत नाही तर सक्तीने लग्न करून दिल्या जाते. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदरच भावनिक आणि शारीरिक धमकी देऊन त्यांना लग्न करण्यास भाग पडलं जाते. त्याची  चला गावाकडील सोडा आता जे शिकलेले लोक आहे ते सुद्धा काही कमी नाही. महिला सक्षमीकरणच्या नावाखाली मुलींना पदवी पर्यंत शिक्षण दिल जाते व पदवी मिळायच्या अगोदरच "शुभ मंगल सावधान". मुलांच्या बाबतीत पण असाच होत का???? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मते 

" स्त्री जात समाजाचा अलंकार आहे". 

लग्न करण्यासाठी मुलींवर कौटुंबिक दबाव हा एक सामान्य गुन्हा आहे जो 80/100 भारतीय कुटुंबांमध्ये होतो. संस्काराच्या नावाखाली लग्नाला एक विशेष दर्जा दिला जातो, परंतु त्या गोष्टीमध्ये बर्‍याच गंभीर जखमांची नोंद होते ज्यामुळे एखाद्याची शांती आणि कल्याण नष्ट होते. बहुतेक भारतीय पालक मुलीला फक्त लग्न आणि श्रद्धेच्या कारणास्तव जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारीपासून मुक्त व्हावी आणि मुलीचे  स्वातंत्र्याने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करतात याकडे दुर्लक्ष करून लग्नासाठी भाग पाडते. .

 लोक त्यांच्या मुलींना लवकर लग्नासाठी भाग पाडतात अशी अनेक कारणे आहेत. सर्वात प्रचलित हे आहेत:

1. आर्थिक समस्या आहेत, जेथे मुलगी घरी ठेवण्याचा खर्च पालक घेऊ शकत नाहीत. 

2. सांस्कृतिक दारिद्र्य आहे, जेथे चुकीच्या प्रथा किंवा परंपरा कायद्याच्या नियमांच्या पडद्याआड आहेत. 

3. सुरक्षिततेची इच्छा: पालक आपल्या मुलीला कुटुंबाचे किंवा मुलीचे संरक्षण करण्यासाठी लग्नासाठी भाग पाडतात.

याच आव्हानांवर मत करण्यासाठी जे उपाय मला संशोधना नंतर मिळाले ते असे 

१. पदवी नंतर उच्च शिक्षण करणे. घरी बसले तर घरचे लग्न लावतील मग काय करायचं तर चला मास्टर डिग्री करूया.  

२. जॉब करते लग्न नको, सध्या मी ज्या कंपनी मध्ये काम करतो तिथे ७५% मुली अश्या आहेत ज्या लग्नाच्या भीती मुळे काम करतायत.

निष्कर्ष:

जरी आपण  म्हणतो की भारत चांगल्या दिशेने प्रगती करीत आहे, सक्ती विवाहामुळे अजूनही मुली   पीडित आहे. जबरदस्तीने विवाह करणे ही एक बेकायदेशीर कृती आहे. यामुळे भारतीय घटनेनुसार हमी मिळालेल्या हक्कांचा आणि मानवाधिकारांनुसार हक्कांचे उल्लंघन होत. तर पीडितांसाठी गंभीर भावनिक आणि शारीरिक धमकी देखील दिली जाते. या मुळे मुलींच्या मनावर आयुष्यभर आघात होतो. भारतीय समाजातील स्त्रियांनी कमीतकमी आपल्या घरात सुरक्षित वाटले पाहिजे, परंतु जिथे पालक त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास भाग पाडतात तेथे असे घडत नाही. त्यामुळे त्यांना आव्हाहन स्वीकारावे लागते ते म्हणजे घरच्यांन विरुद्ध लढण्याचे.

"If she can change her family after marriage then she has the power to change the world before it" 

                                                                              By Rushikesh Thote 

Raise your hand high to show you're in, Show your support and solidarity, and that you commit to #choose to challenge and call out inequality.

 


एक आव्हानात्मक जग बनवण्यासाठी, मदत करण्यासाठी वचनबद्ध लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी #ChooseToChallenge # IWD2021 चा वापर करून सोशल मीडियावर प्रसारित करा. 

*आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा 

Written By
Er. Rushikesh Thote
(7083410343)






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अबब.... पिवळे कलिंगड महाराष्ट्रत!!!!

मानवतेचा कलंक : काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.

Want Motivation ? Revisit Your Past!