#3 TechInfo : इलेक्ट्रिक बाईक ला लायसन्स आणि RC, PUC ची गरज का पडत नाही?
कधी तरी नाक्यावर, चौकात हवालदारानं कशासाठी पण आडवल्यावर पहिला प्रश्न असतोय, लायसन्स दाखव. दुसरा असतोय गाडीची कागदपत्र दाखव. हे दोन्ही क्लिअर असलं तर तिसरा असतो, इन्शुरन्सची, पीयुसीची कागदपत्र दाखव. आता हे पण जर असलं तर मग हेल्मेट, नंबर प्लेट या गोष्टी येतात. थोडक्यात काय. एकदा अडवलं तर कुठल्या तरी गोष्टीत तुम्हाला कात्री लागते हे नक्की . अर्थात या गोष्टी पोलीस मुद्दाम करत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच असतात. मात्र या सगळ्याला अपवाद ठरत आहेत ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कुटर चालवणारे . त्यांना ना कोणी लायसन्स मागताना दिसत, ना कोणी गाडीची कागदपत्र विचारात, ना पीयूसी विचारत. पोलिसांच्या डोळ्यासमोरुन पोरं गाड्या पळवत जातात, पण ते अडवत नाहीत. आणि यात विना हेल्मेट वाली पण असतेत बरं.आता हे कसं काय शक्य आहे ? भारतात सगळ्या गाडयांना कागदपत्र, त्या चालवणाऱ्यांना लायसन्स कम्पल्सरी असेल तर इलेक्ट्रिक बाईकवाले अपवाद का ठरत आहेत ? तर त्याचं कारण सापडतं मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये. "The battery operated vehicle shall not be deemed to be a motor vehicle" म्हणजे काय तर ज्या स्कुटरचा ...