#2 TechInfo : ड्रायव्हरलेस मेट्रोचं काम कसं चालतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दिल्लीत देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.



देशातील ही पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो 38 किलोमीटर अंतराच्या मजेन्टा लाईनवर धावणार आहे. 390 किलोमीटरवर दिल्लीतील मेट्रोचं जाळं पसरलंय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद अशा शहरांनाही हे जाळं जोडतं.

दिल्ली मेट्रो देशातील सर्वात मोठी मेट्रोसेवा आहे. 24 सप्टेंबर 2002 साली शाहदरा ते तीस हजारी स्थानकादरम्यान 8.4 किलोमीटरच्या मार्गावर पहिली मेट्रो धावली.

2002 सालानंतर दिल्ली मेट्रोमध्ये अनेक बदल झाले. ड्रायव्हरलेस मेट्रो आणण्यासाठी मेट्रो रेल्वेज जनरल रुल्स 2020 मध्येही बदल करण्यात आले. यापूर्वी या नियमानुसार चालकाविना मेट्रो चालवण्याची परवानगी नव्हती.

डीएमआरसीने(DMRC) दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ट्रेन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजेच ऑपरेशन रुममधून नियंत्रित केल्या जातील. या केंद्राला ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर अर्थात ओसीसी(OCC)  असं म्हटलं जातं.



अभियंत्यांचा गट रिअल टाईम ट्रेनच्या वाटचालीवर नियंत्रण ठेवेल. विमानांच्या वाहतुकीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं तशा पद्धतीने याचं काम चालेल. डीएमआरसीकडे सद्यस्थितीला तीन ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर आहेत- दोन मेट्रो मुख्यालयात तर एक शास्त्री सेंटर इथे.

कोणत्या लाईनवर ट्रेनची वाहतूक सुरू आहे यावर ड्रायव्हर किंवा ट्रेन ऑपरेटर यांच्याकडे किती नियंत्रण आहे हे अवलंबून असतं.

जुन्या मार्गावर ट्रेनचा वेग तसंच दरवाजे उघडणं, बंद होणं हे ड्रायव्हरच्या हाती असतं. ठराविक वेगापेक्षा ते ट्रेन चालवू शकत नाहीत.

नव्याने सुरू झालेल्या मार्गिंकावर ड्रायव्हर ट्रेन चालवण्याची कमांड देतात. या मार्गांवर ऑटोमॅटिक कंट्रोल बंद करण्यात येतो. जेणेकरून आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ड्रायव्हर तयार राहील.

28 डिसेंबरपासून मजेन्टा मार्गावरील मेट्रो ड्रायव्हरविना चालवल्या जातील. यालाच तांत्रिक भाषेत ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपरेशन (DTO) म्हटलं जातं. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना ट्रेन चालवली जाऊ शकते. डीएमआरसीच्या तीन कमांड केंद्रांच्या माध्यमातून हे काम केलं जाईल.

कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग तकनीक ट्रेनची ये-जा तसंच ट्रेनमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करू शकतो.

एखादं हार्डवेअर बदलण्याच्या वेळेस मात्र मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता असेल.

ड्रायव्हरलेस ट्रेन तांत्रिकतेचं एक मापदंड असतो ज्याला ग्रेड्स ऑफ ऑटोमेशन (GOA) म्हटलं जातं.

डीएमआरसीच्या मते, मेट्रो सर्वस्वी मानवी हस्तक्षेपाविना सुरू होण्याआधीच अनेक कामं स्वयंचलित पद्धतीने होत होती. हाय रेझोल्यूशन कॅमेरे लावलेले असल्याने केबिनच्या माध्यमातून ट्रॅकवर निगराणी ठेवण्याची आवश्यकता नाही. नव्या प्रणालीनुसार, ट्रेन आणि ट्रेनच्या डोक्यावरच्या विजेचा पुरवठा करणाऱ्या तारा यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल. आपात्कालीन स्थितीत तातडीने उपाययोजना केली जाईल. ट्रेनशी निगडीत अन्य माहिती तसंच सीसीटीव्हीचं नियमित परीक्षण केलं जाईल. मात्र अजूनही ही प्रणाली अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन (UTO) म्हणजे संपूर्णपणे मानवविरहित प्रणालीपासून दूर आहे.



Comments

Popular posts from this blog

अबब.... पिवळे कलिंगड महाराष्ट्रत!!!!

मानवतेचा कलंक : काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.

Want Motivation ? Revisit Your Past!