#2 TechInfo : ड्रायव्हरलेस मेट्रोचं काम कसं चालतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दिल्लीत देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला . देशातील ही पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो 38 किलोमीटर अंतराच्या मजेन्टा लाईनवर धावणार आहे. 390 किलोमीटरवर दिल्लीतील मेट्रोचं जाळं पसरलंय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद अशा शहरांनाही हे जाळं जोडतं. दिल्ली मेट्रो देशातील सर्वात मोठी मेट्रोसेवा आहे. 24 सप्टेंबर 2002 साली शाहदरा ते तीस हजारी स्थानकादरम्यान 8.4 किलोमीटरच्या मार्गावर पहिली मेट्रो धावली. 2002 सालानंतर दिल्ली मेट्रोमध्ये अनेक बदल झाले. ड्रायव्हरलेस मेट्रो आणण्यासाठी मेट्रो रेल्वेज जनरल रुल्स 2020 मध्येही बदल करण्यात आले. यापूर्वी या नियमानुसार चालकाविना मेट्रो चालवण्याची परवानगी नव्हती. डीएमआरसीने(DMRC) दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ट्रेन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून म्हणजेच ऑपरेशन रुममधून नियंत्रित केल्या जातील. या केंद्राला ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर अर्थात ओसीसी(OCC) असं म्हटलं जातं. अभियंत्यांचा गट रिअल टाईम ट्रेनच्या वाटचालीवर नियंत्रण ठेवेल. विमानांच्या वाहतुकीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं तशा...