अबब.... पिवळे कलिंगड महाराष्ट्रत!!!!

जर्द हिरवं आणि गोल, आतून रंगला लाल आणि चवीला गोड. भर उन्हाळ्यात शेतकरी ते हायवेला विकत असतात, काही ठिकाणी घरोघरी जाऊन विकत असतात. खाल्ल्यावर उन्हाळ्यात बरचं बर वाटतं. ९७ टक्के पाणी असलेलं हे फळ शरीरात ग्लुकोजची लेव्हल पूर्ण करतं. तर काही काही महाभाग अशा कलिंगडांना व्होडक्याचं इंजेक्शन मारून मस्त कॉकटेल करतात. पण आता याच लाल आणि रसरशीत दिसणाऱ्या कलिंगडांमध्ये नवीन प्रकार आलायं. पिवळ्या कलिंगडाच. हा इस्त्रायलचा प्रकार असल्याच सांगण्यात येत आहे. हल्लीचा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन प्रयोग करणाऱ्यांतील मानला जातो. आधुनिकतेची जोड देत जगभरातील नवं तंत्रज्ञान स्वीकारत आहे. आणि त्यातून ते शेती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक नवीन प्रयोग केलायं कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कोरहळी गावातल्या बसवराज या तरुणानं. हा तरुण ग्रॅज्युएट आहे. पण नोकरीच्या मागं न लागत त्यानं शेतीचा पर्याय निवडला, सांगितलं जेवढं एखाद्या कंपनीसाठी करणार तेवढंच माझ्या शेतीसाठी केलं तर वर्षाला १० एकर शेती घ्यायला कमी करणार नाही. कष्ट मग काय बसवराज शेतीत घुसले आणि पारंपारिक शेतीला फाटा देऊ...